जालना: महापालिकेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची हजेरी प्रणाली कार्यान्वित - अंजली शर्मा,मनपा आयुक्त,महापालिकेत दिली माहिती
Jalna, Jalna | Jun 13, 2026 आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना महानगरपालिका मनपा आयुक्त अंजली शर्मा यांनी माहिती दिली आहे की महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी हजेरीला आळा घालण्यासाठी आता महानगरपालिकेमध्ये हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे,वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ऑनलाइन हजेरी प्रणाली सुरू केली आहे. 1 जूनपासून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाईलद्वारे ऑनलाइन हजेरी प्रणाली कार्यान्वित झाली.