वर्धा: पहिल्या खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेच्या राज्यस्तरीय चाचणीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Jan 10, 2026 केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा मंत्रालयामार्फत पहिल्या खेला इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 20 जानेवारी पासून छत्तीसगड राज्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या निवड चाचण्या होणार असून जिल्ह्यातील पात्र व इच्छूक आदिवासी खेळाडूंनी सहभागासाठी आवश्यक कागदपत्रांसह नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.