नागपूर ग्रामीण: आयुध निर्माणीत असंतोषाचा भडका; ओव्हरटाईमसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र
नागपूर येथील आयुध निर्माणी अंबाझरी मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. निगमीकरणानंतर प्रशासनाने ओव्हरटाईम बंद केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आगामी काळात मागण्या मान्य न झाल्यास थेट संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी युनियनने दिला आहे.