भद्रावती: नागपूर हायकोर्टाकडून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार खांडरे यांचे निलंबन खारीज.
शेतीच्या फेरफार प्रकरणात एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्या केली.या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित केले होते. या निलंबनाच्या विरोधात दोघांनाही नागपूर हाय कोर्टात दाद मागितल्यानंतर कोर्टाने त्यांचे म्हणने ऐकून घेऊन त्यांचे निलंबन खारीज केले आहे.जनभावना लक्षात घेऊन या दोघांची पुर्ननियुक्ती भद्रावती तहसील कार्यालयात करु नये अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.