अकोल्याच्या उगवा फाटा ते आगर रोड, डाबकी रोड रेल्वे गेट ते अमानतपुर रोड तसेच चिचखेडा नाला आणि मळखंड पुलाचे काम २२ एप्रिल २०२५ रोजी मंजूर झाले. मात्र मंजुरी मिळूनही कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला आहे. खराब रस्त्यांमुळे प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. पावसाळ्यात चिखल आणि वाहतुकीतील अराजक यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.