ठाणे: बोगस प्लेसमेंट चालवणाऱ्या परप्रांतीय पांडे बंधूंच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये मनसेची तक्रार
Thane, Thane | Oct 17, 2025 बोगस प्लेसमेंट चालवून मराठी तरुणांना फसवल जात असल्याचा आरोप मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. प्लेसमेंट चालवणाऱ्या परप्रांतीय पांडे बंधूंच्या विरोधात त्यांनी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. संबंधिताला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.