अकोल्यातील झोपडपट्टीधारकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने मंगळवारपासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सकारात्मक भूमिका घेत असतानाही काही कर्मचारी जाणीवपूर्वक गोरगरीबांना त्रास देत घरकुल योजनेपासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला. “घरकुल हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे,” या घोषणांसह थाळी वाजवून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी तत्काळ न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. अशी माहिती गुलाम मुस्तफा यांनी दिली.