जालना: शहरातील समस्यांवरून आयुक्तां विरोधात संताप; आमदार अर्जुना खोतकर खासदार कल्याणराव काळे यांनी भर सभेत घेतला समाचार.
Jalna, Jalna | May 8, 2026 जालना शहरातील वाढत्या नागरिक समस्यांमुळे जालना महानगरपालिकेचे प्रशासन पुन्हा एकदा टीकेच्या केंद्रस्थानी आले आहे. मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, नाल्यांची साफसफाई न होणे, शहरातील अतिक्रमण, रस्त्यांची दुरवस्था तसेच मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षावरून महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि आयुक्त अंजली शर्मा यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जालना तहसील कार्यालय महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मध्ये शिवसेना आमदार