भोकरदन: पारध पो.ठा.येथे चोरीच्या संशयावरून विधी संघर्ष ग्रस्त बालक व पतीला मारहाण महिलेची पो.अधीक्षकांना का. निवेदन देऊन माहिती
आज दि.7 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन ता. तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथील रहिवासी असलेल्या रेखा गायकवाड यांना 2 एप्रिल रोजी त्यांचा एक विधी संघर्ष ग्रस्त बालक व त्यांच्या पतीला गावात 2 वर्षांपूर्वी झालेल्या मेडिकल मध्ये चोरीच्या संशयावरून पारध पो. ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक नेमाने यांनी पोलीस ठाणे येथे 2 एप्रिल 2026 रोजी बोलवून मारहाण केली आहे,याप्रकरणी सदर महिलेने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन प्रसार माध्यमांना माहिती दिली.