धामणगाव रेल्वे: आठवडी बाजार तहसील कार्यालय येथे घुसडी कामनापूर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार कृषी अधिकारी आमदार अडसड यांना दिले निवेदन
सततच्या पावसाने शेतातील सर्व पिकाचे अतोनात झालेल्या नुकसानीचा मोबदला शासना कडुन मिळण्या बाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.मागील एक महिण्याच्या सततच्या पावसामुळे शेतातील शेतमाल सोयाबीन, कापुस, तुर व फळबाग खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. निसर्ग राजाच्या लहरीपणामुळे शेतीमालाचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थीकतेने खुप अडचणीत आलेला आहे. येणाऱ्या रब्बीच्या हंगामा मध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्या कडे शेती तयार करण्याकरीता व बियाण्याची सुध्दा व्यवस्था राहीलेली नाही. असे निवेदन दिले