बहुप्रतिक्षीत असलेल्या रोटरी प्रिमीयर लीगच्या ५ व्या हंगामाला सुरु झाली आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत आणि आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन खेळाडूंना प्रोत्साहित केले. हे क्रिकेट सामने नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये हे क्रिकेट सामने ७ ते ९ आणि १४ ते १६ नोव्हेबर या कालावधीत रंगणार आहे.