हवेली: रावेत येथील सोसायटीत लागली आग सुदैवाने जीवितहानी नाही
Haveli, Pune | Oct 20, 2025 रविवारी (दि. १९) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास रावेत येथील स्वस्तिक ड्रीम्स सोसायटी, चंद्रभागा कॉर्नर, साई प्लॅटिना समोर एका फ्लॅटच्या गॅलरीत अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने फ्लॅटमधील सर्व रहिवाशी गावी गेल्याने जीवितहानी टळली असून, अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.