पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगला प्रकाश आंबेडकरांनी आज भेट देत जैन मुनींशी संवाद साधला. बोर्डिंगच्या प्रॉपर्टी व्यवहाराबाबत त्यांनी सर्व माहिती घेतली असून या प्रकरणात धर्मदाय आयुक्त आणि ट्रस्टी दोषी असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकर म्हणाले, “ट्रस्टच्या मालमत्तेचा व्यवहार कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. ट्रस्टींना ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही.” या प्रकरणी लवकरच कारवाई केली जाणार आहे.