Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: शांती गॅस एजन्सीवर गैरव्यवहाराचा संशय; बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिक संतप्त

Jalna, Jalna | Apr 28, 2026
जालना शहरातील शांती गॅस एजन्सीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देण्यात आले आहे. मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन बुकिंग करूनही ग्राहकांना वेळेत गॅस सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली असून, बुक केलेला गॅस काळ्या बाजारात वळवला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर धोंडीराम इंदलकर (रा.मधुबन कॉलनी, जालना) यांनी तक्रार दिली असून नियमांनुसार गॅस मिळत नसल्याचं म्हटलं.