अंजनगाव सुर्जी: येवद्यात नारीशक्तीचा सन्मान सोहळा उत्साहात पार;राज्यसभा खा.अनिल बोंडे व मा.आ.भिलावेकर यांची उपस्थिती
येवदा येथे आज दुपारी ३ वाजता स्वयंम मल्टी फाउंडेशन तर्फे "नारीशक्ती सन्मान सोहळा" मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.या प्रसंगी राज्यसभा खासदार अनिल बोंडे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष व मा.आमदार प्रभुदास भिलावेकर प्रमुख उपस्थित होते.महिलांच्या कार्याचा गौरव करताना खासदार बोंडे यांनी सांगितले की,समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान अनमोल असून त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य सन्मान मिळायला हवा.