अकोला: आई लव मोहम्मद प्रकरणी गुन्हे रद्द करण्याची मागणी, शेकडो मुस्लिम बांधवांचे जिल्हाकचेरी समोर धरणे आंदोलन
Akola, Akola | Sep 29, 2025 कानपूरमधील "आई लव मोहम्मद" बॅनर प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो मुस्लिम बांधवांनी जोरदार धरणे आंदोलन केले. एआयएमआयएमच्या नेतृत्वाखाली आसिफ अहमद खान, जावेद पठान आणि इरफान खान यांनी आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनकर्त्यांनी म्हटले की, "आई लव मोहम्मद" म्हणणे किंवा लिहिणे हे धार्मिक आस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यांनी गुन्हे तात्काळ मागे घेण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई