अंजनगाव सुर्जी: अनिल गौर यांचा प्रसन्न मंगल कार्यालय येथे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जंगी प्रवेश
अंजनगाव सुर्जी येथील प्रसन्न मंगल कार्यालयात आज दुपारी १ वाजता स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अनिल शामलालजी गौर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जंगी प्रवेश केला.या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रभूदासजी भिलावेकर,प्रा.दिनेशजी सूर्यवंशी,शिवराज कुलकर्णी, निवेदिता ताई दिघडे,माजी आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.