झरी जामणी: मुकुटबन शहरात ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक
मुकुटबन शहरात ईद-ए-मिलादुन्नबी आज दि 5 सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण शांततेत साजरी करण्यात आली. दरम्यान शहराच्या मुख्य मार्गाने जुलूस काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव लहान चिमुकले मिरवणुकीत सहभागी झाले होते. ईद मिलादुन्नबी च्या जुलूस मधे मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार कुलकर्णी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.