पनवेल: मानसरोवर रेल्वे स्थानकातील शौचालयाच्या अत्यंत दुरावस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Panvel, Raigad | Nov 12, 2025 कामोठे परिसरातील नागरिकांनी मानसरोवर रेल्वे स्थानकातील शौचालयाच्या अत्यंत दुरावस्थेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर करत तक्रार नोंदविल्यानंतर, भारतीय जनता पार्टी कामोठे शहराच्या पदाधिकारी आणि शहरध्यक्ष विकास घरत यांनी तत्काळ याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. विकास घरत यांच्या उपस्थितीत भाजप मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने स्टेशन मॅनेजर यांची भेट घेऊन शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था, पाण्याचा अभाव, तुटलेले नळ आणि तीव्र दुर्गंधी याबाबत जाब विचारला.