बुलढाणा: ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढा,अन्यथा शासकिय योजनांचा लाभ मिळणार नाही - जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निमिर्ती आणि शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅकअंतर्गत आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जावून तात्काळ तयार करुन घ्यावा. फार्मर आयडी नसल्यास शासकिय योजनांचा लाभ मिळणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी १५ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता केले आहे.