दर्यापूर: दर्यापूरात काँग्रेसला बळ! काँग्रेस कार्यालयात उद्धव नळकांडे व प्रमोद साखरे यांचा पक्षात प्रवेश
दर्यापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात इन्कमिंग वाढताना दिसत आहे. आज दुपारी ४ वाजता दर्यापूर येथील काँग्रेस कार्यालयात उद्धव नळकांडे व प्रमोद साखरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या उपस्थितीत प्रवेश प्रक्रिया पार पडली. नळकांडे व साखरे यांच्या प्रवेशामुळे दर्यापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे बळ अधिक वाढले असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.