भंडारा: राष्ट्रवादीला बळ! माजी आमदार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बेलगाव व तुमसर येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भंडारा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेला बळ मिळाले आहे. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान बेलगाव (मांडवी) येथील मनोहर केवट आणि राजेंद्र मेश्राम यांनी वाघमारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसेच, तुमसर येथील वासूदेव चरडे (वार्ड क्र. ७) यांनीदेखील पक्षाच्या ध्येयधोरणांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवे