जालना: जिल्हा व सत्र न्यायालयात उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा;न्यायाधीश,सरकारी वकील,वकील संघ पदाधिकार्यांची उपस्थिती
Jalna, Jalna | Jun 21, 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते न्यायालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात न्यायाधीश, सरकारी वकील, वकील संघाचे पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी तसेच विधी सेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रविवार दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.