पोलिसांनी कामठी तालुक्यातील वडोदा येथील मालवा पंजाब ढाबा येथे छापा मार कार्यवाही करून डोडा पावडर जप्त केली आहे. आरोपीकडून डोडा पावडर व इतर साहित्य असा एकूण तीन लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी लुधियाना निवासी असलम प्यारा खान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.