माण: माण तालुक्यात काळचौंडी येथे युवकावर प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना म्हसवड पोलिसांनी केली अटक
Man, Satara | Oct 4, 2025 माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या हद्दीत झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. सुरेश सावंत, कैलास माने, प्रतिक माने, साहिल माने, सत्यवान माने सर्व राहणार काळचौंडी ता. माण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साजन अरुण चव्हाण, रा. काळचौंडी हा दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.