जळगाव: पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीचा हाहाकार; मंत्री गिरीश महाजन यांची कुऱ्हाड, वेरुळी, सातगाव आणि शिंदाड भागात पाहणी
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड, वेरुळी, सातगाव आणि शिंदाड या गावांमध्ये नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्वतः केली. त्यांच्यासोबत माजी आ. दिलीप वाघ आणि वैशालीताई सूर्यवंशी उपस्थित होत्या. या पाहणी दौऱ्यात त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.