पनवेल: खारघर वसाहतीत पुन्हा सोनेरी कोल्ह्याच दर्शन
सामाजिक कार्यकर्ते दीपक सिंग यांच्या मोबाईलमध्ये कोल्ह्याची जोडी झाली कैद
Panvel, Raigad | Sep 21, 2025 खारघर येथे सोनेरी कोल्हा आणि भटके कुत्रे एकत्र वावरत असल्याचे व्हिडीओ या पूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे सोनेरी कोल्ह्यांचा अधिवास आणि संरक्षणाचा मुद्दा त्या वेळी ऐरणीवर आला होता. आता पुन्हा एकदा खारघर वसाहतीत भटक्या कुत्र्यांसोबत फिरणारी सोनेरी कोल्ह्याची जोडी दिसून आली असून, सामाजिक कार्यकर्ते दीपक सिंग यांनी आपल्या मोबाईल मध्ये शनिवारी रात्री सोनेरी कोल्ह्यांची जोडी कैद केली असल्याची माहिती सिंग यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता दिली.