आज दिनांक 26 डिसेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील तळणी येथे मोटोरोला कंपनीच्या मोबाईलसह कपाटातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना दिनांक २३ डिसेंबरला सकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी उघडकीस आली आहे. याबाबतीत संदीप लक्ष्मणराव बहुरूपी यांनी दिनांक 24 डिसेंबरला दोन वाजून 34 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे