पुणे शहर: हडपसरमध्ये ऑनलाईन टेंडरच्या नावाखाली साडेबारा लाखांची फसवणूक.
Pune City, Pune | Oct 19, 2025 हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८९२/२०२५ अंतर्गत भा.दं.सं. कलम ३१९(२), ३१८(४) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २३ वर्षीय इसमाने ऑनलाईन माध्यमातून नामांकित कंपनीच्या टेंडर देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करत, तब्बल ₹१२,४०,९५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी मोबाईल व लिंक धारकांची तपासणी सुरू केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.