भोकरदन: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डॉ.नितीन कटेकर उपयोगी पोलीस अधिकारी यांना आत्मदान संदर्भात पती-पत्नीचे निवेदन
आज दि.8 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन ता.तीर्थक्षेत्र जाळीचा देव येथील पती-पत्नी रेखा विजय गायकवाड व विजय नामदेव गायकवाड या जोडप्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर यांना निवेदन देऊन मागणी केली, 2 एप्रिल रोजी पारध पो.ठाण्याचे स.नि. संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने यांनी या पती-पत्नीच्या लहान मुलाला व त्यांना मारहाण केली,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा नसता 21 जून रोजी आत्मदान करणार आहे.