18 डिसेंबरला रात्री 8:00 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे तहसील हद्दीतील अग्रेसर चौक येथे 45 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाढलेल्या थंडीमुळे हा मृत्यू झाल्याचे म्हटल्या जात आहे याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.