परभणी: खाजगी करणाच्या विरोधात विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीचे महावितरण समोर 72 तासांचे काम बंद आंदोलन सुरू
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने महावितरण अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर आज गुरुवार 9 ऑक्टोबर पासून महावितरण, महापारेषण, महानिर्मीती कंपनीतील विविध मार्गाने होणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधात 72 तासांचा संप पुकारला आहे.