आता नाशिक शहरानंतर मालेगाव पोलिसही ऍक्शन मोड वर.. नाशिक पॅटर्न’ आता मालेगावात देखील दिसू लागला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पहाटे तीन वाजेच्या सुमारास हातात तलवारी घेऊन मालेगावच्या गल्लीबोळात फिरत रील बनवून दहशत पसरवणाऱ्या टोळीला अखेर मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली. या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी शहरभर धिंड काढली. धिंड काढताना त्यांना कान धरून “कायद्याचा जिल्हा नाशिक जिल्हा” असे म्हणण्यास भाग पाडण्यात आले.