तेल्हारा: पंचगव्हाण फाट्यावर इरटिका गाडीचा भीषण अपघात : एक ठार, पाच जखमी जखमेवर अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
Telhara, Akola | Oct 16, 2025 अकोला जिल्ह्यात पंचगव्हाण फाट्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. शिवसेना शिंदे गटाचे अकोला संपर्कप्रमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन परतणाऱ्या कार्यकर्त्यांची इरटिका गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत अक्षय म्हसाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातात अनिकेत ढवळे, निखिल हिवराळे, अंकित खंडारे, राजेश गावत्रे आणि शिवराम गिरी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.