21 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे कॉलनी परिसरातून इ रीक्षाने मांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला अजनी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली आहे. आरोपीकडून ई रिक्षा आणि 120 चक्री नायलॉन आणि इतर साहित्य असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एहतेशाम खान व मोहम्मद मेहबूब आलम यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे