तुमसर: गोबरवाही पोलिसांची मोठी कारवाई, ट्रॅक्टर बॅटरी चोरी रॅकेटचा पर्दाफास, तीन आरोपी अटकेत
तुमसर तालुक्यातील मोठागाव आसलपाणी येथे दि. 14 डिसेंबर रोजी अज्ञात आरोपींनी फिर्यादी धनपाल माधोराव गोपाले यांच्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेले .याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी घटनेतील तीन आरोपींना ताब्यात घेतले. रवी बागडे, अनिकेत मडाये तसेच मंगेश कुशवाह असे आरोपींची नावे असून आरोपींच्या ताब्यातील एक्साइड, ॲमरान व पावर झोन कंपनीच्या चार ट्रॅक्टर बॅटऱ्या तसेच चोरीसाठी वापरणारी चार चाकी वाहन असा एकूण 4 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.