सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून अनेक कामे आर्थिक वर्ष संपूनही अपूर्ण असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा, वर्धा जिल्ह्याच्यावतीने करण्यात आला आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांनी या संदर्भात राज्याचे गृहनिर्माण, शिक्षण, संस्कृती व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन दिले आहे.