तीन नोव्हेंबरच्या रात्री कामठी रोडवर भीषण अपघात झाला, प्रत्यक्ष दर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती त्यांची कार उभी करून बाहेर गेले असता भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली आणि ते वाहन पळून गेले. धडक इतकी जोरदार होती की त्या कारच्या एअर बॅग उघडल्या. कारचा समोरील भाग पूर्णपणे चकनाचूर झालेला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.