अचलपूर: तळेगाव मोहना येथे पतीचा पत्नीवर बाश्याच्या काठीने हल्ला, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
तळेगाव मोहना येथे घरगुती वादातून पतीने पत्नीवर बश्याच्या काठीने हल्ला केल्याची घटना घडली. ११ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रीमती येणुबाई पुडलीक शेकोकार (वय ४२) ह्या घरी टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी त्यांचा पती संजय पुडलीक शेकोकार (वय ४२) हा दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपी संतापला. संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यावर बश्याची काठी मारून जखमी केले तसेच शिवीगाळही केली. जखमी पत्नीने पोलिसांत तक्र