अमरावती: अमरावतीत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत तारांचे सुद्धा नुकसान
अमरावतीत आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी झाडे सुद्धा कोसळली आहे. त्यामुळे विजांच्या तारांचे सुद्धा नुकसान झाले आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या शिवटेकडी वर सुद्धा वाऱ्यामुळे काही झाडे खाली कोसळली पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच यावेळी गाडगे नगर, राजापेठ, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, फरशी स्टॉप, रुक्मिणी नगर आदी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.