उल्हासनगर: उल्हासनगर मध्ये रस्त्यांना आले स्विमिंग पूल चे स्वरूप, मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात झोपून केले अनोखे आंदोलन
उल्हासनगर परिसरात रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी असते त्यामुळे अंदाज येत नाही आणि अपघात होतात त्यामुळे अनेकांचे नाहक बळी जातात. या घटनेच्या निषेधार्थ मनसे पदाधिकारी योगेश देशमुख यांनी रस्त्यावरील खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले आणि प्रशासनाचा निषेध केला. रस्त्यावर स्विमिंग पूल तयार झाला आहे त्यात अंघोळ करण्याचा आनंद घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील दिली.