टिका टिप्पणी करणाऱयांनी आमच्या प्रभागात आमच्या विरोधात निवडणूक लढवावी अस डोंबिवली येथील भाजप नेते दिपेश म्हात्रे यांनी संजय राऊत यांच्यासह अविनाश जाधव यांना आज दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास आव्हान दिलं आहे. संजय राऊत आणि अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून हे आव्हान देण्यात आल आहे.