भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून, जोपर्यंत या भागात सिंचनाची ठोस व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत प्रस्तावित 'सिंगल फेज फिटर लाईन'चे काम थांबवण्यात यावे, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शेतीसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसताना केवळ वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत; उलट सिंचनाअभावी शेतीचे उत्पन्न कसे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.