राजूरा: आंबेझरी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश
शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचावा हेच आमचे ध्येय असून त्यासाठी भाजपाचे सरकार सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.राजुरा विधानसभा क्षेत्रातील आंबेझरी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज दि 10 नोव्हेंबरला 12 वाजता भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आ. भोंगळे बोलत होते.