कल्याण: धोकादायक झाडे तोडण्यासाठी ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
Kalyan, Thane | Oct 23, 2025 कल्याण येथील गणेश नगर मध्ये अवकाळी पावसामुळे काल एक झाड पडले होते. त्यामुळे ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याण मधील धोकादायक झाडे तोडा अन्यथा अधिकाऱ्यांना तोडू असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2च्या सुमारास माहिती देण्यात आली आहे.