हिंगोली: वेलतुरा येथील मातंग समाजाच्या स्मशान स्मशानभूमीवरील ताबा तात्काळ हटवा,तहसीलदारांना निवेदन
हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा येथील मातंग समाज बांधवांच्या स्मशान भूमीवर काही नागरिकांनी ताबा केला असून त्यामुळे तात्काळ शासनाने दखल घेऊन सदर स्मशानभूमीच्या जागेवरील ताबा हटवावा अशी मागणी वेलतुरा येथील गमातंग समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार सेनगांव यांच्याकडे निवेदनाद्वारे आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.