माहितीनुसार घोगली रोडवरील माउंट लिटेरा शाळेसमोर रेतीने भरलेला ट्रक अचानक पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र जर शाळा सुरू असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्याच्या दुर्दशामुळे हा अपघात झाल्याचा ठपका स्थानीय नागरिकांनी ठेवला आहे.