परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी 31 जानेवारीला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन थंडर अंतर्गत जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त करून नष्ट करण्यात आला. परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही करून तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला होता तो आज नष्ट करण्यात आला आहे. यावेळी शाळेकरी विद्यार्थी देखील उपस्थित होते याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.