जळगाव जामोद: सुनगाव येथे अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस, पोलिसात तक्रार दाखल
सुनगाव येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याची घटना उघडकिस आली आहे याविषयी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याविषयी वडिलांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रारीत म्हटले आहे की मुलगी कुणाला काही न सांगता घरून निघून गेली तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.