पनवेल: पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
Panvel, Raigad | Nov 12, 2025 युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र रायगड, पनवेल महानगरपालिका, जिल्हा प्रशासन रायगड, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्थानिक सीकेटी महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने “सरदार@150 युनिटी मार्च” आणि “विकसित भारत पदयात्रा” याउपक्रमाचे आयोजन 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत पनवेल येथे करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावनानिर्माण करणे असा आहे. या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य,अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील.